बेरोजगारीची स्थिती आटोक्‍याबाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - देशातील बेरोजगारीची परिस्थिती विदारक झालेली असून, सरकारच्या आटोक्‍याबाहेर गेली आहे. युवकांचा धीर सुटला आहे. आज मुंबईत हजारो विद्यार्थ्यांना रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करावे लागले, ही घटना याचे निदर्शक असून, सरकारने वेळीच जागे व्हावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला.

चव्हाण म्हणाले, की देशात दररोज जवळपास ३३ हजार युवक रोजगार मिळवण्याकरिता तयार होतात आणि केवळ ४५० नवीन रोजगार तयार होतात. त्यातच सध्या नोकरीत असलेल्या नोकरदारांपैकी ५५१ लोकांच्या नोकऱ्या रोज जात आहेत. मोदी यांनी दर वर्षी २ कोटी रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील म्हाडा, महापालिका या विविध संस्थांमार्फत त्यांच्या ताब्यातील इमारतींमध्ये घुसखोरी रोखण्याकरिता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. यासाठी ‘आधार’ आधारित कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांंनी सांगितले.  

वाढीव मानधनासाठी १२६ कोटी वितरित
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या वाढीव मानधनाचे १२६ कोटी राज्य सरकारने वितरित केले आहेत. वाढीव मानधन सेविकांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाविषयी चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

आक्रोश दाबता येणार नाही
ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने युवक आंदोलनात उतरले त्यातून देशातील युवकांची मानसिकता दिसून येते. यात अनेक युवतीही होत्या त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला. दमनशाहीने जनतेचा आक्रोश सरकारला दाबता येणार नाही. सरकारने या लाठीमाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

Web Title: marathi news ashok chavan congress maharashtra