चंद्रकांत पाटलांचा रुद्रावतार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि संघाच्या विचारधारेलाच विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. परिचारकांनी केलेले वक्तव्य हा विषय विचारधारेशी जोडता कामा नये, असा इशारा देत चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला आपला रुद्रावतार दाखविला. खवळलेल्या पाटील यांना पाहून विरोधी बाकांवरील सदस्यही आवाक झाले होते; तर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, गृह राज्यमंत्री डॉ.

मुंबई - सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि संघाच्या विचारधारेलाच विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. परिचारकांनी केलेले वक्तव्य हा विषय विचारधारेशी जोडता कामा नये, असा इशारा देत चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला आपला रुद्रावतार दाखविला. खवळलेल्या पाटील यांना पाहून विरोधी बाकांवरील सदस्यही आवाक झाले होते; तर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर आदी त्यांना आवरण्यासाठी पुढे सरसावले. 

विधान परिषद सदस्य परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे, ही घातक परांपरा असल्याचे शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले. त्यावर चंद्रकांत पाटील संतापले. प्रत्येक वेळी आमच्या विचारधारेविषयी बोलणे योग्य नसल्याचे सांगत कपिल पाटलांना आव्हान देणे सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज सुरवातीला दहा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागते. 

परिचारक यांच्या निलंबनाच्या मुद्यावरून चर्चा सुरू असताना कपिल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

या वेळी कपिल पाटील म्हणाले, ""परिचारकांचे निलंबन रद्द करून त्यांना सभागृहात बोलाविणे घातक परंपरा सुरू होईल. कारण त्यांनी जे शब्दप्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर प्रश्न अधिक गंभीर बनतो. परिचारक यांना परत बोलविण्याची संमती कोणी दिली, हे समजले पाहिजे? परिचारक जे बोलले ते माफ करण्यासारखे आहे का, असे सरकारने अगोदर स्पष्ट करावे.'' 

Web Title: marathi news chandrakant patil Prashant Paricharak maharashtra