विधानपरिषदेसाठी युतीचा 3-3 चा फॉर्मुला-रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नाशिकः राज्यात विधान परिषदेच्या सहा पैकी 3-3 जागांचा भाजप-शिवसेनेचा फार्मूला ठरला आहे. दोघांनी एकमेकांना मदत करावी. नाशिकमध्ये आमचा उमेदवार नाही, भाजपचा कोणालाही छुपा पाठिंबा नाही  असे  रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. मालेगावमध्ये आज भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. अपुर्व हिरे व त्यांचे कुटुंबिय चर्चाच करत नाहीत तर त्यांची नाराजी कशी कळेल, मात्र हिरेच्या सर्व हालचालीवर भाजपचे बारीक लक्ष आहे, असेही दानवे यांनी सांगितले. भाजप 2019 ची निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढवेल.

नाशिकः राज्यात विधान परिषदेच्या सहा पैकी 3-3 जागांचा भाजप-शिवसेनेचा फार्मूला ठरला आहे. दोघांनी एकमेकांना मदत करावी. नाशिकमध्ये आमचा उमेदवार नाही, भाजपचा कोणालाही छुपा पाठिंबा नाही  असे  रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. मालेगावमध्ये आज भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. अपुर्व हिरे व त्यांचे कुटुंबिय चर्चाच करत नाहीत तर त्यांची नाराजी कशी कळेल, मात्र हिरेच्या सर्व हालचालीवर भाजपचे बारीक लक्ष आहे, असेही दानवे यांनी सांगितले. भाजप 2019 ची निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढवेल. निवडणूकीनंतर देशात व राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर येईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news danve press