भिडे, एकबोटे तेथे गेले होते का माहिती नाही: मंत्री केसरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्हा अधीक्षक यांच्याकडून सीसीटीव्ही तपासणी केली जात आहे. भीमा कोरेगावबरोबर वढू बुद्रुक येथील प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, पण संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कारण हे प्रकरण अतिसंवेदनशील आहे.

मुंबई : मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे तेथे गेले होते का हे मला माहिती नाही. कोणी एफआयआर दाखल केला, म्हणजे तत्काळ अटक करता येणार नाही. भिडे गुरुजींच्या कार्याचा ही विचार करावा लागेल. एफआयआर चुकीची असू शकते, यामुळे संपूर्ण चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याविषयी बोलताना केसरकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

केसरकर म्हणाले, की कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्हा अधीक्षक यांच्याकडून सीसीटीव्ही तपासणी केली जात आहे. भीमा कोरेगावबरोबर वढू बुद्रुक येथील प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, पण संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कारण हे प्रकरण अतिसंवेदनशील आहे. या प्रकरणात समाजात पडलेली फूट न परवडणारी आहे. समाधीची ज्यांनी तोडफोड केली त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news Deepak Kesarkar talked about Bhima Koregaon