धर्मा पाटील यांच्या मुद्यावरून शिवसेनेने राज्य सरकारला घेरले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - आधीच्यांनी शेण खाल्ले म्हणून लोकांनी आपल्याला सत्तेत बसवले. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये आपले सरकार धर्मा पाटील यांना का न्याय देऊ शकले नाही' अशा खरमरीत शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला फटकारले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य सरकारला मंत्रिमंडळ बैठकीत घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांची चौकशी समिती नियुक्‍त केली. 

या समितीने धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या मूल्यांकनाबाबत चौकशी करून याबाबतचा अहवाल पुढील आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्याचे निर्देश देण्यात आले. 

जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करणारे शेतकरी धर्मा पाटील यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्याचे पडसाद आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा विषय काढत चर्चेला तोंड फोडले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वत: निवेदन करावे, अशी मागणीही रावतेंनी केली. 

धुळ्यातील विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पाच्या जमिनीच्या मोबदल्याबाबत बावनकुळे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या वक्‍तव्यांमध्ये ताळमेळ नसल्याने याबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांची नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिव सुमीत मलिक यांची समिती नियुक्‍त केली. संबंधित औष्णिक प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे दर आणि खासगी व्यावसायिकांकडून जमिनी खरेदी करण्याच्या दरांमध्ये काय फरक आहे, याविषयी चौकशी केली जाईल. 

Web Title: marathi news dharma patil shivsena state government