अमरिश पटेल यांनी विधान परिषद सदस्यत्वाची घेतली शपथ 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 16 December 2020

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघातील निवडणुकीत आमदार पटेल यांनी ४३७ पैकी ३३२ मतांनी विजय मिळविला.

शिरपूर  ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी मुंबईतील विधान भवनात मंगळवारी विधान परिषद सदस्यत्वाची अर्थात आमदारकीची शपथ घेतली.

आवश्य वाचा- धुळे जिल्ह्याला जानेवारीत कोरोना लस

सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी झाला. 
शपथविधीनंतर राज्यातील दिग्गज नेत्यांसह सभापती निंबाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी आदींनी आमदार पटेल यांचा सत्कार केला. विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघातील निवडणुकीत आमदार पटेल यांनी ४३७ पैकी ३३२ मतांनी विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत श्री. पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वाचा- भाजपने केले कृषी विधेयकाचे दुधा अभिषेक करून केले स्वागत -

त्यामुळे मतदारसंघातील जागा रिक्त झाली. त्याच जागेवर भाजपकडून श्री. पटेल निवडून आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून आमदार पटेल यांच्याकडे पाहिले जाते. ३५ वर्षांच्या वाटचालीत विधान परिषदेत निवडून जाण्याची त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule amrish patel took oath as MLA