कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यासंदर्भात चर्चेस गोव्याची तयारी

विलास महाडिक
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पणजी (गोवा) - कर्नाटकातील काही भाग दुष्काळग्रस्त म्हादईचे पाणी पिण्यासाठी देण्यासंदर्भात गोवा सरकार व्दिपक्षीय चर्चा करण्यास तयार आहे. असे कर्नाटकचे खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येड्डीयुरप्पा यांना आज पाठविलेल्या पत्रात कळविले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. 

पणजी (गोवा) - कर्नाटकातील काही भाग दुष्काळग्रस्त म्हादईचे पाणी पिण्यासाठी देण्यासंदर्भात गोवा सरकार व्दिपक्षीय चर्चा करण्यास तयार आहे. असे कर्नाटकचे खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येड्डीयुरप्पा यांना आज पाठविलेल्या पत्रात कळविले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. 

काल दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत कर्नाटकमधील काही दुष्काळग्रस्त भागासाठी म्हादईचे पाणी पिण्यासाठी देण्याची मागणी कर्नाटकच्या भाजप नेत्यांकडून केली होती. यासंदर्भात आज गोवा सरकारमध्ये असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांना कल्पना देऊन त्यासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे कळविले आहे. कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यासंदर्भात राष्ट्रीय पक्षाध्यक्षांकडून गोवा सरकारवर कोणताच दबाव आणला गेला नाही. या पिण्याच्या पाण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी पक्षाध्यक्ष या नात्याने त्यांनी कर्नाटकमधील भाजप नेते व गोवा सरकारची ही बैठक बोलावली होती. 

म्हादईप्रश्न सध्या म्हादई तंटा लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळेच या लवादमधील सुनावणीशी या चर्चेचा काहीच संबंध नसेल असे कायदेशीर सल्ला घेऊन पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पिण्यासाठी पाणी देण्यास गोवा सरकारचा विरोध नाही. यापूर्वीही लवादाने म्हादईशी संबंधित असलेल्या राज्यांना सामंजस्याने तोडगा काढण्यासंदर्भात सूचित केले होते. माणुसकीच्या दृष्टीकोनातून सरकारने सध्या चर्चेची तयारी दाखविली आहे. या चर्चेनंतर त्याचा व्दिपक्षीय करार होऊन तो लवादासमोर ठेवला जाईल. किती प्रमाणात पिण्याचे पाणी द्यायचे संदर्भात चर्चेनंतरच ठरेल. कर्नाटकने 7.56 टीएमसी पिण्यासाठी पाणी द्यावे अशी विनंती केली आहे. 

 

Web Title: Marathi news Goa government Karnatak BJP drought problem