7/12 उतारे "हॅंग'; तलाठ्यांची "ई फेरफार साइट' बंद

देविदास वाणी
रविवार, 3 जून 2018

जळगाव ः एकीकडे शासनाने एक मेपासून ऑनलाइन पद्धतीने संगणकीकृत उतारा देत असल्याचा गाजावाजा करीत आहे; तर दुसरीकडे राज्यातील तलाठी कार्यालयातील "ई फेरफार साइट' सतरा दिवसांपासून बंद असल्याने हे ऑनलाइन उतारेच "हॅंग' झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना 7/12 उतारे मिळत नसल्याने पीककर्जासाठी मोठी अडचण उभी राहिली आहे. पेरण्या तोंडावर आल्याने कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. 

शासनाने आता हाताने लिहिलेला सातबारा उतारे देणे बंद करण्याबाबतचा आदेश काढल्याने हाताने लिहिलेला उतारा तलाठी देत नाहीत. मे-जून महिन्यात शेतकरी पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी करीत असतो. कोणत्याही बॅंकेत पीक कर्जासाठी सातबारा उतारा द्यावा लागतो. मात्र, गेल्या 15 मे पासून "ई फेरफार साइट' बंद असल्याने उताऱ्यांअभावी शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे. राज्य शासनाने "ई फेरफार साइट' त्वरित सुरू होण्याबाबत राज्य स्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

तलाठ्यांशी भांडणे 
सातबारा उताऱ्यासाठी शेतकरी गेल्या सतरा दिवसांपासून तलाठी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. मात्र "साइट' बंद असल्याचे कारण सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. परिणामी शेतकरी आता तलाठ्यांशी भांडू लागले आहेत. 

"ई फेरफार साइट' गेल्या सतरा दिवसांपासून बंद आहे. शेतकरी रोज येऊन सातबारा उताऱ्यासाठी आग्रह धरतात. ही साइट बंद असल्याने उतारे देता येत नाहीत. नागरिकांना रोज काय कारण सांगावे, हा प्रश्‍न पडतो. 

- जे. डी. बंगाळे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा तलाठी महासंघ. 

Web Title: marathi news jalgaon talthi 7/12 site