कपिल पाटील यांना धमकावल्याचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांना धमकावल्याबद्दल मंगळवारी मुंबईसह राज्यभरात छात्रभारती, शिक्षक भारती आणि संयुक्त जनता दलाच्या शरद यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

मुंबईत परळ येथे शहीद बाबू गेनू पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. कपिल पाटील यांनी कधीही असभ्य भाषा वापरली नाही. त्यामुळे त्यांच्यावर धावून जाणे, त्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणे हे निषेधार्ह असल्याचे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोहे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news kapil patil mumbai