महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरु केली. दरमहा १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले. आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रीत केले आहे. होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.