"मॅग्नेटिक'मध्ये दुसऱ्या दिवशी 43 सामंजस्य करार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

मुंबई - "मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांमुळे राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 30 लाख रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. 

मुंबई - "मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांमुळे राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 30 लाख रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. 

हे सामंजस्य करार करणाऱ्यांमध्ये देश-विदेशांतील नामांकित उद्योगसमूहांचा समावेश आहे. या करारांवर स्वाक्षऱ्या करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारांनुसार क्रेडाई, नारेड्‌को, एमसीएचआयसारख्या संस्था एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधणार आहेत. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पोदार हौसिंग, रहेजा डेव्हलपर, येस बॅंक, रेमंड्‌स, टाटा पॉवर, अदाणी ग्रीन एनर्जी, वलसाड जिल्हा को-ऑपरेटिव्ह मिल्क, स्पॅनडेक्‍स, खालिजी कमर्शिअल बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक आदींशीही करार झाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी विविध क्षेत्रांतील गुंतवणूक कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा झाली. 

सोमवारी झालेल्या करारांमध्ये स्पॅनडेक्‍स (12 हजार 350 कोटी), जिनस पेपर नंदूरबार (एक हजार 50 कोटी), येस बॅंक (10 हजार कोटी), राज बिल्ड इन्फ्रा एलएलपी (दोन हजार 946 कोटी), के. रहेजा डेव्हलपर्स (चार हजार 850 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज इंडस्ट्रियल सिटी (12 हजार कोटी), क्रेडाई महाराष्ट्र (एक लाख कोटी), नारडेको (90 हजार कोटी), एमसीएचआय क्रेडाई (75 हजार कोटी), खालीजी कमर्शिअल बॅंक ऍण्ड भूमिराज (50 हजार कोटी), पोतदार हाऊसिंग (20 हजार कोटी), मंगल नमोह गृहनिर्माण (25 हजार कोटी), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (सात हजार कोटी), टाटा पॉवर कंपनी (15 हजार 560 कोटी), रिन्यू पॉवर व्हेंचर (14 हजार कोटी), जेएनपीटी (सात हजार 915 कोटी), जेम्स ऍण्ड ज्वेलरी (13 हजार 800 कोटी), व्हर्जिन हायपरलूप (40 हजार कोटी) यासह एसबीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, एस बॅंक, बीव्हीजी लाईफ, नेट मॅजिक, रेडिमेड गार्मेंट क्‍लस्टर, वलसाड जिल्हा सहकारी बॅंक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटिक ग्रीन, बांबू फर्निचर, सोलास इंडस्ट्रियल सिटी, वाडा आदींशी झालेल्या करारांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Magnetic Maharashtra Convergence 2018 mumbai