आज राज्याचा अर्थसंकल्प

शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज(शुक्रवार) राज्याचा 2018-19चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार असून, कृषी क्षेत्रावर यामध्ये भर दिला जाणार आहे. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सुधीर मुनगंटीवार हे आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात (2017-17) कृषी, उद्योग, स्थावर मालमत्ता, हॉटेल व्यवसाय आदी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत पीछेहाट झाल्याचे समोर आले. राज्य प्रगतीच्या मार्गावर असले तरी, उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात होणारी वाढ आणि कृषी उत्पादनातील घट ही राज्य सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्याबाबतच्या उपाययोजना शुक्रवारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समोर येतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सांगितले होते.

Web Title: marathi news maharashtra budget sudhir sudhir mungantiwar