मराठीचा अपमान होताना शिवसेना गप्प होती: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग करावा लागला कारण १२ कोटी मराठी भाषिकांचा सरकारने अपमान केला. आमच्या काळातही राज्यपाल हिंदी, इंग्रजीत भाषण करायचे. पण विधानसभेच्या २८८ व विधानपरिषदेच्या ७८ मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे. पण यावेळी भाषण सुरु १५ मिनिटं होऊनही भाषांतर केले गेले नाही.

मुंबई : उद्या मराठी भाषा दिन. त्याच्या पूर्वसंध्येलाच सभागृहात मराठीचा अपमान केला गेला. शिवसेनाही यावेळी गप्प बसली होती. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या भाषणावर नाईलाजाने बहिष्कार टाकला व विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून या सरकारचा निषेध केला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. तर, हे अभिभाषण गुजरातीत अनुवादीत झाल्याने विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

अजित पवार म्हणाले, की आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग करावा लागला कारण १२ कोटी मराठी भाषिकांचा सरकारने अपमान केला. आमच्या काळातही राज्यपाल हिंदी, इंग्रजीत भाषण करायचे. पण विधानसभेच्या २८८ व विधानपरिषदेच्या ७८ मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे. पण यावेळी भाषण सुरु १५ मिनिटं होऊनही भाषांतर केले गेले नाही. आम्ही वारंवार सूचना केली तरिही भाषांतर झाले नाही.

Web Title: Marathi news Maharashtra news Ajit Pawar criticize government on Marathi