‘जीएसटी’ करभरणात महाराष्ट्र अव्वल

प्रकाश बनकर
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

तीस हजार कोटी एसजीएसटी; १६ हजार कोटी रुपये सीजीएसटी जमा
औरंगाबाद - देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राने करभरणा करण्यात देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३० हजार कोटी एसजीएसटी; तर १६ हजार कोटी सीजीएसटीचा भरणा राज्यात करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय राज्य अर्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे. 

एक जुलैपासून एक देश - एक कर प्रणालीसाठी वस्तू व सेवाकर प्रणाली लागू करण्यात आली. राज्यात जीएसटीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे करदात्यांची संख्या वाढून कराचा भरणाही मोठ्या प्रमाणावर झाला. ३१ डिसेंबरपर्यंत देशात १ लाख कोटी करदात्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केली असल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. 

गुजरातलाही टाकले मागे
औद्योगिकीरणात पुढारलेल्या गुजरातलाही मागे टाकत महाराष्ट्रातून ३० हजार १८६ कोटी राज्य वस्तू व सेवा कर, तर १६ हजार ६३९ कोटी केंद्रीय वस्तू व सेवा कर वसूल झाला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशने ११ हजार कोटी रुपये वसूल करीत दुसरे स्थान पटकावले. गुजरात सातव्या स्थानी गेला आहे. गुजरातमध्ये ६ हजार १३९ कोटी सीजीएसटी, १२ हजार ६७ कोटी रुपये एसजीएसटीचा भरणा झाला आहे.

Web Title: marathi news maharashtra news GST Tax Maharashtra Topper