मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुरेश भट कधी झालात?: जयंत पाटील

ब्रह्मा चट्टे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुख्यमंत्री जयंत पाटील यांना मध्येच थांबत मुख्यमंत्री म्हणाले, "कोण मुख्यमंत्री असताना मराठी हाल सोसते हे सुरेश भटांना लिहावे लागले ते सांगितले तर तुमची अडचण होईल जयंतराव. आम्ही हे कडवे लिहलेलं नाही. त्यामुळे सुरेश भटांनी कोणाच्या काळात हे गीत लिहलं हे पहा." 

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाची आज (मंगळवार) सुरवात होताच विरोधक अाक्रमक झाले होते. मराठी भाषा दिन कार्यक्रमात मराठी गौरव गीतातील शेवटचे कडवे वगळल्यामुळे विरोधक संतप्त झाले होते. याप्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधक वेलमध्ये उतरले होते. त्यामुळे पहिल्यांदा 15 मिनिटे कामकाज स्थगीत करण्यात आले. त्यानंतर वाढता गोंधळ पाहून कामकाज 12 वाजता तहकूब करण्यात आले.

आज अर्थसंकल्पीय आधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नियम 97 अन्वये बोलायला उभे राहिले. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "आपण कामकाज गुंडाळून मराठी भाषेच्या गौरवासाठी चर्चा घ्या. मराठी भाषेच्या दिनादिवशीच मराठी भाषेच्या गौरव गीतातील कडवे वगळले आहे. हा झालेला प्रकार गंभीर आहे. सरकारने मराठीचा आपण केला आहे.  राज्याच्या आस्मितेला धक्का लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आग्रह विखे पाटील यांनी धरला. 

शेवटचे कडवे राज्यासाठी राज्यातील जनतेसाठी आणि महत्वाचे म्हणजे शिवसेनेसाठी महत्वाचं आहे, असं सांगत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील म्हणाले, हे कडवे किती महत्वाच आहे. ते पहा ("शिवसेनेच्या आमदारांकडे पहात) 
पाहूणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे अले कितीक खेळ पहाते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी"

त्यावर शिवसेनेची आमदारही आवाक् झाले होते. शिवसेनेच्या आमदारांच्या मदतीला शेवटी मुख्यमंत्री धावले.

मुख्यमंत्री जयंत पाटील यांना मध्येच थांबत मुख्यमंत्री म्हणाले, "कोण मुख्यमंत्री असताना मराठी हाल सोसते हे सुरेश भटांना लिहावे लागले ते सांगितले तर तुमची अडचण होईल जयंतराव. आम्ही हे कडवे लिहलेलं नाही. त्यामुळे सुरेश भटांनी कोणाच्या काळात हे गीत लिहलं हे पहा." 

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिवादावर जयंत पाटील म्हणाले, "सुरेश भटांनी जे कडवे लिहलले आहे ते आजही सत्य आहे. तुम्ही सुरेश भट्ट कधी झालातं. तुम्ही कडवे का वगळले ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. यावर अाक्रमक होत मुख्यमंत्र्यांनी जयंतरावांना उलट प्रश्न केला. मुख्यमंत्री म्हणाले, "जयंतराव हा आधिकार तुम्हाला कोणी आधिकार दिला. तुम्ही कोण, तुम्हाला काय आधिकार हा विचारायचं? 

यावर जयंत पाटीलांच्या मदतीला सगळे विरोधी आमदार धावून आले. सरकारने माफी मागावी म्हणून विरोध अक्रमक झाले होते. याप्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधक वेलमध्ये उतरले होते. गोंधळ वाढत असल्याने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिल्यांदा 15 मी. कामकाज स्थगीत करण्यात केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन केले. त्यावरही समाधान न झाल्याने विरोधकांनी वेलमध्ये उतरत गोंधळ घातला. त्यानंतर वाढता गोंधळ पाहून कामकाज 12 वा. तहकूब करण्यात आले.

Web Title: Marathi news Maharashtra news Jayant Patil criticize Devendra Fadnavis