मुख्यमंत्री जयंत पाटलांमध्ये कलगीतुरा; एकमेकांना दिले आव्हान

ब्रह्मा चट्टे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

विधानसभेत आज कमला मील जळीत काडांसंबंधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सुचना मांडली. या लक्षवेधीवर चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईतील कमला मील प्रकरणासह अन्य गिरण्यांच्या जमीन वापरांची चौकशी करण्यात येईल. ज्या धोरणांमुळे गिरणी कामगारांना घरांपासून वंचीत ठेवण्यात आले. त्या दोषींना सोडणार नाही. मुळचे धोरण कोणी बदलले याचीही आम्ही चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

मुंबई : विधानसभेत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला. चौकशीवरून मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांनी एकमेकांना आव्हान दिले. चौकशीला भीत नसल्याचा जयंत पाटलांनी दावा केला तर चौकशीपासून तुम्ही मला रोखू शकत नसल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विधानसभेत आज कमला मील जळीत काडांसंबंधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सुचना मांडली. या लक्षवेधीवर चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईतील कमला मील प्रकरणासह अन्य गिरण्यांच्या जमीन वापरांची चौकशी करण्यात येईल. ज्या धोरणांमुळे गिरणी कामगारांना घरांपासून वंचीत ठेवण्यात आले. त्या दोषींना सोडणार नाही. मुळचे धोरण कोणी बदलले याचीही आम्ही चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर हारकत घेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, मुळ प्रश्न कमला मीलला आग कशी लागली हा आहे. मात्र, त्याविषयी बोलण्याऐवजी मुख्यमंत्री राणाभीमदेवी थाटात चौकशीच्या घोषणा करत आहेत. आम्ही चौकशीला भीत नाही. चार वर्ष काय झोपले होते काय? कमला मील प्रकरणी  लक्षवेधी सुचना आहे आपण मूळ विषयाला बगल देत चौकशीच्या गप्पा का करत आहेत, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.

यावर प्रतिवाद करताना मुख्यमंत्री म्हणाले, "अध्यक्ष महोदय मी चौकशी म्हणल्यावर तुम्हाला का आग लागली. राणाभीमदेवी थाट असू किंवा नसो. जयंत पाटील तुम्ही मला चौकशीपासून रोखू शकत नाहीत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालयाचे माजी न्यायाधिशांमार्फत सुरू आहे. आग कोणामुळे लागली कोण याला जबाबदार आहे. यासंबंधी सगळ्यांना अटक केली आहे. त्यामुळे यासह सगळ्या प्रकाराची चौकशी होणारच ! 

जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या या कलगी तुऱ्यामुळे वेलमध्ये उतरलेेले आमदार आधिकच जोराने घोषणाबाजी करू लागले. अमर रहे अमर रहे धर्मा पाटील अमर रहे, सेना भाजप सरकारचा निषेध, भाजप सरकार हाय हाय, शिवसेना सरकार हाय हाय, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत विरोधक वेलमध्येच उभे राहिले होते.

Web Title: Marathi news Maharashtra news Jayant Patil Devendra Fadnavis clash