भुजबळांच्या प्रकृतीचे 12 वाजले, सरकार करतयं काय?: जितेंद्र आव्हाड

विजय गायकवाड
मंगळवार, 6 मार्च 2018

भुजबळांवरील गैरव्यवहार अजून सिध्द झालेले नाहीत. त्यांचे हिमोग्लोबीन ८ झाले आहे. तरी रांगेत उभे राहून कागदपत्रे दाखवून तपासण्या कराव्या लागतात. जनरल वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. भुजबळ आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे माणुसकी दाखवून वैद्यकीय सुविधांची पुर्तता करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळांची प्रकृती नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करुन जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधां अभावी त्यांच्या तब्बेतीचे १२ वाजले आहे. त्यांचा गुन्हा अजून सिध्द झालेला नाही. माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्याची किती अवहेलना करणार? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केला.

भुजबळांवरील गैरव्यवहार अजून सिध्द झालेले नाहीत. त्यांचे हिमोग्लोबीन ८ झाले आहे. तरी रांगेत उभे राहून कागदपत्रे दाखवून तपासण्या कराव्या लागतात. जनरल वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. भुजबळ आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे माणुसकी दाखवून वैद्यकीय सुविधांची पुर्तता करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामधे सरकराचा कोणताही हस्तक्षेप नसतो असे सांगत. भुजबळांना आरोग्याच्या सुविधा वेळेत पुरवण्याबाबत तुरुंग प्रशासनाला कळवण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Marathi news Maharashtra news Jitendra Awhad statement on Chagan Bhujbal