नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशींचे पॅनेल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक वैयक्तिक उमेदवारांऐवजी आता प्रसाद कांबळी विरुद्ध दीपक करंजीकर, अशी रंगणार आहे. प्रसाद कांबळी यांचे पॅनेल "आपलं पॅनेल' म्हणून; तर दीपक करंजीकर यांची टीम "मोहन जोशी पॅनेल' या नावाने लढणार आहे. 

प्रसाद कांबळी यांनी "आपलं पॅनेल' या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभही केला आहे; तर मोहन जोशी निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले असले, तरीही त्यांचे काम मतदारांसमोर ठेवूनच प्रचार केला जाणार असल्याचे दीपक करंजीकर यांच्या पॅनेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच यंदाची ही निवडणूक पॅनेलभोवतीच फिरणारी असून, मतदार राजा कोणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news maharashtra news mohan joshi natya parishad