अखेर नारायण राणेंनी स्वीकारली राज्यसभेची 'ऑफर'

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची ऑफर आज (शनिवार) अखेर स्वीकारली आहे. नारायण राणे सोमवारी (ता.12) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची ऑफर आज (शनिवार) अखेर स्वीकारली आहे. नारायण राणे सोमवारी (ता.12) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.   

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर नारायण राणेंना राज्यामध्ये मंत्रिपद हवे होते. मात्र, भाजपकडून त्यांना त्यासाठी कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. त्यानंतर भाजपकडून राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरु केल्या जात होत्या. तसेच नारायण राणे यांनी मागील काही दिवसांपूर्वी याबाबतचा निर्णय जाहीर करू असे सांगितले होते. त्यानंतर आज नारायण राणे यांनी भाजपने दिलेली राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे. येत्या सोमवारी ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

दरम्यान, नारायण राणे यांना भाजप कोट्यातून उमेदवारी देण्यात आली असून, राज्यसभेवरील त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

Web Title: Marathi News Maharashtra News Political News Narayan Rane Accepts BJP Offer of Rajya Sabha