लोकसेवा आयोगाची न्यायालयीन चौकशी करा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून डमी विद्यार्थी बसवून निवड केली जात असल्याचे प्रकरण गंभीर असून, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

मुंडे यांनी दिलेल्या सूचनेवर उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी "सीआयडी' अंतर्गत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असल्याची माहिती दिली. त्यावर धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने त्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मदन येरावार यांनी या प्रकरणी 24 आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटच्या माध्यमातून नोकरीस लागलेल्या उमेदवारांवरही कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या पुढील काळात परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: marathi news maharashtra news Public Service Commission inquiry court dhananjay munde