राज्यात तूर खरेदी उद्यापासून सुरू 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई  - गेल्या वर्षीच्या विक्रमी तूर खरेदीमुळे यंदाच्या खरेदीनंतर साठवणुकीच्या समस्येसह राज्यात 1 फेब्रुवारीपासून किमान आधारभूत दरावर तूर खरेदी सुरू होणार आहे. "नाफेड' आणि पणन महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत तूर खरेदीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी आणि गोण्या उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने पुरेशी तयारी करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षीचे विक्रमी तूर उत्पादन आणि खरेदीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सरकारने तुरीला बोनससह पाच हजार 450 रुपये हमीभाव जाहीर केला आहे; मात्र सध्या बाजारात तुरीला मिळत असलेले दर खूपच कमी आहेत. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्र सरकारने 19 जानेवारीला राज्याला 44 लाख 60 हजार क्विंटल तूर खरेदीची परवानगी दिली आहे. पुढील 90 दिवस तूर खरेदी करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत; मात्र अद्यापही तूर खरेदी सुरू झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर "नाफेड' आणि पणन महासंघाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत तूर खरेदीच्या अनुषंगाने "नाफेड' आणि पणन महासंघामध्ये खरेदीचे करार करण्यात आले. या वेळी येत्या 1 फेब्रुवारीपासून सरकारी तूर खरेदी सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सुरवातीला राज्यभरातील 146 खरेदी केंद्रांवर तूर खरेदी केली जाणार आहे. 

साठवणुकीची समस्या कायम 
गतवर्षीच्या विक्रमी तूर खरेदीनंतर राज्य वखार महामंडळाची गोदामे तुरीने भरली आहेत. यंदाचे तुरीचे वाढीव उत्पन्न आणि विक्रमी खरेदीमुळे साठवणुकीची समस्या आहे. पणन महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून वखार महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याशिवाय एनबीएसी आणि केंद्रीय वखार महामंडळाकडून साठवणुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे "नाफेड'च्या महाराष्ट्र व्यवस्थापक भाव्या आनंद यांनी सांगितले.

Web Title: marathi news maharashtra news tur