संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करा - विखे पाटील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

शिर्डी, (जि. नगर) - धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री त्यातील जमीन खरेदी करून लगेच खातेफोडदेखील करतात. त्याचवेळी धर्मा पाटील मात्र अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून शेवटी मंत्रालयात जाऊन विषप्राशन करतात. हे सरकारचे मोठे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. 

विखे पाटील म्हणाले, ""प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांची आत्महत्या नाही, तर तो सरकारी यंत्रणेच्या अनास्थेचा बळी आहे. त्यांनी मंत्रालयात जाऊन विषप्राशन केल्यानंतर सरकार जागे झाले. त्यांना वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. तोपर्यंत सरकार झोपले होते का? एका बाजूला सामान्य शेतकरी कामासाठी हेलपाटे मारून आत्महत्या करतात, तर दुसरीकडे मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करून लगेचच खातेफोडदेखील करतात, ही गंभीर बाब आहे.'' या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. सर्व संबंधितांवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news maharashtra news vikhe patil Dharma Patil Suicide Case nagar