ट्रेंडमध्ये कसा आला मराठा क्रांती मोर्चा? नेटवर भगवं वादळ

maratha reservation
maratha reservation

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची भव्यता आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर महाराष्ट्राच्याराजधानीत आलेलं भगवं वादळ सोशल मीडियावरही जोरदार घुमू लागलं आणि पाहता पाहता ट्विटर ट्रेंडमध्ये #MarathaKrantiMorcha सर्वांत वर चर्चेत आला. इंग्रजीसह मराठी आणि हिंदी व इतर भाषांतूनही सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. 

विविध ऑनलाईन माध्यमांसह सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाच्या विषयावर सर्वाधिक चर्चेत राहिला. महाराष्ट्रासह देशभरातील आणि जगभरातील केवळ मराठी नव्हे अमराठी माणसांनीही विविध ऑनलाईन व्यासपीठांवरून मराठा क्रांती मोर्चाबद्दलच्या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने महिलांवरील अत्याचार, आरक्षण, सामाजिक आर्थिक विषमता अशा विविध मुद्द्यांवर सोशल मीडियावर साधकबाधक चर्चा होताना दिसून येत आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सरकारला मराठा क्रांती मोर्चाचे औचित्य साधून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला धारेवर धरले. तत्पूर्वी, हा मोर्चा अयशस्वी करण्यासाठी सरकारने मराठा समाजामध्ये गटतट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

मात्र, आजच्या मोर्चाचे यश पाहता आणि नेटिझन्सनेही दाखवलेला मोठा उत्साह यावरून प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याबरोबरच मराठ्यांनी ऑनलाईनही मराठा क्रांती मोर्चाही तितकाच यशस्वी करून दाखवला आहे. दरम्यान, या मोर्चावरून वेगळे मुद्दे उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तरे देण्यात नेटिझन मराठे, ट्विटराटी मागे न हटता चर्चेत यशस्वीपणे पुढे राहिल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com