'मराठी ज्ञानभाषेसाठी प्रयत्न करू'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत सर्वच साहित्यिक आणि साहित्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. याबाबत आवश्‍यक ती भूमिका सरकार नक्‍की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात दिली.

या वेळी मुंबईत सुरू होणाऱ्या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’कडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी मराठी भाषा व सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. 

मराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्हावे, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती ‘ग्रंथाली’ने मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात बॅंडस्टॅंड येथे महापालिकेची जागा यासाठी उपलब्ध करून दिली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधान भवनात आज झालेल्या औपचारिक कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे जागेबाबतचा करार सुपूर्त करण्यात आला. तसेच ‘ग्रंथाली’च्या कार्यालयासाठी माहीम टायकलवाडी येथील जागेचा करार ही गांगल यांच्याकडे सोपविण्यात आला. 

या वेळी फडणवीस म्हणाले, की ‘ग्रंथाली’ ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ‘ग्रंथाली’ काम करते आहे. आमदार शेलार यांनी पुढाकार घेऊन ‘ग्रंथाली’च्या कार्यालयासाठीच्या जागेचा विषया मार्गी लावला. मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या दिवशी विद्यापीठाच्या जागेचा करार ही आपण करतो आहोत. मराठी भाषेचे काम करणाऱ्या उपक्रमाला आवश्‍यक ती मदत यापुढे करण्यात येईल.  

या वेळी ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, कवी डॉ. महेश केळुसकर, सुदेश हिंगलासपुरकर, अरुण जोशी, पद्मभूषण देशपांडे, धनंजय गांगल, मोहन खैरे, धनश्री धारप, लतीका भानूशाली, दिलीप चावरे आदींसह आमदार प्रसाद लाड आणि नरेंद्र पवार उपस्थित होते.

अशिष शेलार यांचा पुढाकार
मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अचानक ‘ग्रंथाली’च्या विद्यमान कार्यालयाची जागा रिकामी करण्याची नोटीस दिली होती. त्या वेळी साहित्य वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याच वेळी तातडीने आमदार अशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत त्याचा पाठपुरवा केला. त्यानुसार आज नव्या जागेचा करारही फडणवीस यांनी ‘ग्रंथाली’ला सुपूर्त केला. 

Web Title: marathi news marathi Devendra Fadnavis maharashtra