नगर परिषदांत भाजपची लाट; दहापैकी सात शहरांत भाजपचे नगराध्यक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

मुंबई : भाजप - शिवसेना युती सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर व राज्यात विविध समस्यांवरून सरकारविरोधी विरोधकांचे मोर्चे, दिंड्या निघत असताना आज पुन्हा एकदा नगर परिषदा निवडणुकीत भाजपची लाट कायम असल्याचे निकालातून दिसते.

राज्यात दहापैकी सात नगर परिषद व नगरपंचायतींत भाजपला यश मिळाले असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दणका बसला आहे. तर ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने एकहाती वर्चस्व मिळवीत पहिल्यांदाच ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला आहे. ठाणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला जबरदस्त दणका देत शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे. 

आज ठाणे जिल्हा परिषद व दहा नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले. यात हुपरी, नंदूरबार, नवापूर, किनवट, शिंदखेडा, फुलंब्री व सालकेसा या नगर परिषदात भाजने घवघवीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षांच्या कारभाराला शहरी जनतेने पुन्हा एकदा कौल देत विरोधकाना नाकारले आहे.

पांढरकवडा या नगर परिषदेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला यश मिळाले असून, भाजप व काँग्रेसला जनतेने नाकारले. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राष्ट्रवादीला धक्‍का देत भाजपचे कमळ फुलले आहे. तर कोल्हापूरमधील हुपरी नगर परिषदेतही भाजपला यश मिळाल्याने, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातही भाजपची लाट कायम असल्याचे मानले जाते. आतापर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या नंदूरबार, नवापूर या आदिवासी भागांत लोकसभेपासून सुरू झालेली भाजपची लाट कायम राहिली आहे. या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्षासह पॅनेलदेखील विजयी झाले आहे. 

निकाल.......... 
किनवट पालिका 

पक्ष................जागा (18) 
भाजप...........9 
राष्ट्रवादी..................6 
काँग्रेस....................2 
अन्य......................1 

शिंदखेडा नगरपंचायत 
पक्ष......................जागा (17) 
भाजप....................9 
काँग्रेस.....................6 
समाजवादी पक्ष...............2 

फुलंब्री नगरपंचायत 
पक्ष.....................एकूण जागा (17) 
भाजप..................11 
आघाडी............5 
एमआयएम........1 

हुपरी नगरपालिका. 
पक्ष........................एकूण जागा (18) 
भाजप..................7 
ताराराणी आघाडी...........5 
प्रणित आघाडी..........2 
शिवसेना....................2 
अपक्ष........................2 

Web Title: marathi news marathi websites Maharashtra politics BJP Nagar Parishad Devendra Fadnavis