हार्दिक पटेल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

मुंबई - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला नाकीनऊ आणणारे सामाजिक कार्यकर्ते हार्दिक पटेल उद्या गुरुवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत असून, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई कॉंग्रेसच्या समाज माध्यम टीमशी संवाद साधणार आहेत. 

उद्या गुरुवारी 21 फेब्रुवारी रोजी हार्दिक पटेल मुंबईला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते 4 वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई कॉंग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधणार आहेत. आजच्या युगात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पहिले जाते. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूसदेखील आपले विचार, आपल्या भावना जगासमोर मांडू शकतो. या सोशल मीडियाचा अचूक आणि प्रभावी वापर कसा करावा, याविषयी हार्दिक पटेल मुंबई कॉंग्रेसच्या समाज माध्यम टीमला मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: marathi news mumbai hardik patel