मुंबई-पुणे द्रुतगतीवर आज "मेगा ब्लॉक' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याच्या क्षेत्रातील दगड काढण्यासाठी बुधवारी (ता. 31) राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने "मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून ठराविक अंतराने 15 मिनिटांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

पावसाळ्यात महामार्गावर दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घेतली आहे. पावसाळ्यातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी महामंडळाने आडोशी बोगद्याजवळील दरड कोसळण्याच्या क्षेत्रातील दगड काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला महामार्ग पोलिसांनी परवानगी दिली असून, उद्यापासून सकाळी 10 पासून कामाला सुरवात होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3.15 या कालावधीत टप्प्या-टप्प्याने हे काम चालणार असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news mumbai news mumbai-Pune expressway megablock