संघाच्या बौद्धिक वर्गाला अनुपस्थित राहिल्याने खडसे, देशमुखांना नोटीस

nagpur
nagpur

नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान गेल्या तीन वर्षांपासून रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजप आमदारांची कार्यशाळा होत असून, आज (बुधवार) झालेल्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप नोटीस बजावणार आहे. यामध्ये एकनाथ खडसे, आशिष देशमुख या प्रमुख नेत्यांची नावे आहेत. 

भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते. रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीमंदिरात वर्गासाठी एकत्र आले होते. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान या वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. 

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाचा आज विशेष दिवस आहे. कामकाजाव्यतिरिक्त सत्ताधारी भाजपचे आमदार आज बाह्य सत्ताकेंद्र असलेल्या संघ मुख्यालयात दाखल झाले होते. दुसरीकडे सभागृहात त्यातही विधानसभेत 293 नियमान्वये शेतकरी प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे. या उत्तरातून शेतकऱयांच्या पदरी काय पडतं, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

या बौद्धिक वर्गाला अनुपस्थित राहिलेल्या एकनाथ खडसे, आशिष देशमुख, रणजित पाटील या प्रमुख नेत्यांना नोटीस पाठवून कारणे विचारण्यात येणार असल्याचे पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com