आता 'रंग दे महाराष्ट्र'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

नंदुरबार - राज्यातील 11 जिल्ह्यांतील 350 शाळा, अंगणवाड्या आणि 120 ग्रामपंचायती रंगविण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि धडगाव तालुक्‍याचा समावेश आहे. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट भारताचे एकत्रित विकासात्मक प्रयत्न जगासमोर आणणे, ही यामागची मूळ कल्पना आहे.

सामाजिक समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक विकासाच्या मूलभूत पातळीवर काम करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेण्याची मोहीम महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) या संघटनेतर्फे आखण्यात आली आहे. गुरुवारी (22 मार्च) आंतरराष्ट्रीय रंग दिन होता. त्यानिमित्त "रंग दे महाराष्ट्र' मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी फाउंडेशनतर्फे कन्साई नेरोलॅक आणि टाटा ट्रस्ट यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे.

सहभागी जिल्हे
अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, रायगड आणि नंदुरबार.

Web Title: marathi news nandurbar news rang de maharashtra