मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

भाईंदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात आज सुदैवाने टळला. मुंबईजवळील भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा अपघात सुदैवाने टळला. 

मीरा भाईंदर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी आले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिलेला नाही. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्याचे टाळले आहे. 

आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेच्या प्रांगणात हे उतरवण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने प्रयाण केले.

Web Title: marathi news national news CM Phadnavis helicopter Accident