
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी ऑपरेशन टायगर सक्रीय केले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसलाही धक्का देण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. पुण्यातील महाविकास आघाडीच्या तीन माजी आमदारांसह 9 मोठे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.