सांस्कृतिक नगरीची कचराकुंडी

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 3 मार्च 2018

मुंबई - कचरा प्रक्रियेचे अनुक्रमे एक हजार आणि शंभर टन क्षमतेचे दोन प्रकल्प बंद अवस्थेत असल्यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरू लागले आहे. रोज शहरात तब्बल सतराशे मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत असून, यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर पुणेकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. डंपिंग ग्राउंड संदर्भात औरंगाबदमध्ये मागील काही दिवसांपासून पेटलेला वाद पुण्यातही निर्माण होऊ शकतो. 

मुंबई - कचरा प्रक्रियेचे अनुक्रमे एक हजार आणि शंभर टन क्षमतेचे दोन प्रकल्प बंद अवस्थेत असल्यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरू लागले आहे. रोज शहरात तब्बल सतराशे मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत असून, यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर पुणेकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. डंपिंग ग्राउंड संदर्भात औरंगाबदमध्ये मागील काही दिवसांपासून पेटलेला वाद पुण्यातही निर्माण होऊ शकतो. 

"स्मार्ट सिटी'कडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरापुढे कचरा व्यवस्थापनाचे गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्‍न पालिका प्रशासनाला पडला आहे. पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन करताना 2013 मध्ये शंभर टन क्षमतेचा दिशा प्रकल्प 2013 मध्ये सुरू झाला होता. मात्र स्थानिकांचा विरोध आणि न्यायालयीन प्रकरणामुळे 2015 मध्ये तो बंद पडला आहे. एक हजार टन क्षमतेचा हंजर प्रकल्प 2010 मध्ये सुरू झाला. मात्र पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू नसल्यामुळे 2013 मध्ये तो बंद करण्यात आला. दरम्यान, नगरविकास खात्याने 25 बायोगॅस प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पांची प्रत्येकी पाच टन इतकी क्षमता आहे. सध्या 20 प्रकल्प सुरू आहेत. मात्र शहरात रोजच्या कचरानिर्मितीचा वेग पाहता हे प्रकल्प तुटपुंजे ठरत आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उर्वरित प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या, मात्र मुदत संपल्याने फेरनिविदा प्रक्रिया सुरू आहे, तर दोन प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले आहेत. वडगाव, घोले रोड, येरवडा येथील प्रकल्प सुरू आहेत, तर कात्रज, पेशवेपार्क येथील प्रकल्पांच्या फेरनिविदा प्रक्रिया सुरू आहेत. अनेक प्रकल्प बंद असल्याने सरकारचे करोडो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी पुणे शहरासाठी "स्वतंत्र पर्यावरण प्राधिकरण' करण्याची मागणी होत आहे. 

कचरा वर्गीकरण 
ढोबळ मानाने कचरा वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते. यामध्ये ओला व सुका कचरा याचा समावेश होतो. सुक्‍या कचऱ्याचे विविध असे 26 प्रकारे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. सुक्‍या कचऱ्यापासून अनेक प्रकारची खेळणी, खुर्च्या तयार करता येतात. कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक ही मुख्य समस्या आहे. एक किलो कचऱ्यात 60 ते 70 टक्‍के इतका ओला, तर 30 ते 40 टक्‍के इतका सुका कचरा असतो. 

झिरो बजेट कचरा व्यवस्थापन 
अत्यंत कमी खर्चात कचऱ्यापासून मुक्‍तता मिळविता येते. यामध्ये ओला कचरा खड्डे खणून त्यामध्ये गाडणे आणि त्यानंतर त्याचे कंपोस्ट खत तयार करणे, यासाठी कोणताही प्रकल्प अथवा यंत्र आदींची गरज नाही. एक व्यक्‍ती साधारणपणे दिवसाला 300 ग्रॅम कचरा निर्माण करते. त्यास दरडोई कचऱ्याचे प्रमाण असे संबोधिले जाते. 

प्रमुख शहरांत 
निर्माण होणारा कचरा 
..... 
प्रमाण : मेट्रिक टनांमध्ये 
मुंबई- 8 हजार 
पुणे- 1700 
ठाणे- 1400 
नागपूर- 1000 

Web Title: marathi news pune garbage health smart city maharashtra