
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईतील अंधेरी येथे एका लग्न समारंभात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले. ठाकरे बंधूंची ही तीन महिन्यात तिसरी भेट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वार्तालाप सुरु असताना काहीतरी विनोद झाल्याने रश्मी ठाकरे या हसताना दिसत आहेत.