उद्‌घोषक गैरहजरची चौकशी करा - निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद वाचण्यास उद्‌घोषक उपस्थित नव्हता. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल आल्यानंतरही अधिक सखोल चौकशी करा, असा आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद वाचण्यासाठी योग्य वेळी उद्‌घोषक उपस्थितीत नव्हता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. राज्यपालांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचा आदेश दिला होता. याबाबतचा प्राथमिक अहवाल सभापतींनी आज विधान परिषदेत मांडला. या अहवालानुसार श्रीराम केळकर यांची अनुवादक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केळकर संसदीय कार्य विभागाच्या कक्षात काल उपस्थितही होते. केळकर ज्या वेळी आले, त्या वेळी राज्यपालांची येण्याची वेळ झाल्याने विधिमंडळात कडक सुरक्षा असल्याने त्यांना रेकॉर्डिंग रूमपर्यंत पोचता आले नव्हते, असे अहवालात म्हटले आहे; मात्र हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याची अजून सखोल चौकशी करण्याचा आदेश सभापतींनी दिला आहे.

Web Title: marathi news ramraje nimbalkar Budget session