ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. रारावीकर  यांचे नवी दिल्ली येथे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नाशिकः येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर (वय 83) यांचे आज (ता. 1) पहाटे नवी दिल्ली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बिटको महाविद्यालयात अर्थशास्त्राचे अध्यापन केले. 1964 ते 67 या काळात ते कोपरगाव महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाले. अर्थसंकल्प हा त्यांच्या विशेष व्यासंगाचा विषय होता. केंद्र सरकारने त्यांना "बजेट ऍवॉर्ड' देऊन गौरवले होते. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली असून, शोधनिबंधांना 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे.

नाशिकः येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. यशवंत रारावीकर (वय 83) यांचे आज (ता. 1) पहाटे नवी दिल्ली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बिटको महाविद्यालयात अर्थशास्त्राचे अध्यापन केले. 1964 ते 67 या काळात ते कोपरगाव महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाले. अर्थसंकल्प हा त्यांच्या विशेष व्यासंगाचा विषय होता. केंद्र सरकारने त्यांना "बजेट ऍवॉर्ड' देऊन गौरवले होते. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली असून, शोधनिबंधांना 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे. नाशिक महापालिका, अल्पबचत खाते, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ अशा संस्थांचे ते आर्थिक सल्लागार होते. सावानातर्फे त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव झाला आहे. शहरातील भाभानगर येथे अनेक वर्ष वास्तव्यानंतर ते नुकतेच दिल्लीत स्थायिक झाले होते. त्यांच्यावर दुपारी दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेच्या धोरण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांचे ते वडील होत. 
 

Web Title: marathi news raravikar passaway