‘राजा तू चुकलास, तू सुधारलं पाहिजे’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना सरकार केवळ मूक साक्षीदार का होते,’ असा सवाल करत, ‘राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस’, असा थेट सल्ला सरकारला स्पष्टपणे देत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारवर थेट हल्ला चढविला. 

न्यूड, एस. दुर्गा आणि पद्मावत या चित्रपटांची गळचेपी करण्याचे धोरण सरकारी आणि झुंडशाहीच्या बळावर झाले, सेन्सॉरने मान्यता देऊनही काही राज्ये त्यावर प्रदर्शन बंदी घालतात, दिग्दर्शकाला मारण्यासाठी, अभिनेत्रीचं नाक कापण्यासाठी इनामाची घोषणा केली जाते आणि ती करणाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. 

‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी करणारे हे प्रकार सुरूच असल्याने कला साहित्यजगत अस्वस्थ आहे. या धार्मिक उन्मादी वातावरणाचा निषेध म्हणून यापूर्वी पुरस्कार वापसीचा मार्ग स्वीकारला होता. ती भूमिका सरकारने समजून घ्यायला हवी होती. कारण, आधुनिक सुसंस्कृत जगात शासन कलावंतांपुढे नम्र असतं; पण भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: marathi news Sayajirao Gaikwad Sahityanagari marathi sahitya sammelan marathi