जीएम संशोधन थांबू नये - पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा जीएम पिकांचे समर्थन केले आहे. अन्नसुरक्षा आणि उत्पादकतावाढीसाठी जैवतंत्रज्ञानाचे निरंतर संशोधन आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी पुरेशा तपासण्या आणि पर्यावरण सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे सुचवले आहे. बीटी कापसाची घटलेली प्रतिकारक्षमता आणि बीटीच्या (एचटी) एसआयटी चौकशीमुळे जीएम संशोधन थांबले आहे. 

"सकाळ'शी बोलताना शरद पवार म्हणाले, की जनुकीय सुधारित (जीएम) पिके देशाच्या अन्न सुरक्षा समस्या सोडवू शकतात. तथापि, या प्रकरणात पर्यावरण सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या बाबींवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असून बीटी वांगी, मोहरी आणि तांदळाच्या चाचण्या प्रलंबित आहेत. 

देशात अन्नसुरक्षेच्या समस्येसाठी जीन सुसंस्कृत पिके वापरणे आवश्‍यक आहे, असे सांगत पवार म्हणाले, की खरे तर आम्हाला देशात अन्नसुरक्षेच्या समस्येचा पर्याय हवा आहे. आपली उत्पादनक्षमता वाढवावी लागेल. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानसहित अन्य तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sharad pawar maharashtra GM Research