शिर्डी दुहेरी हत्याकांडात पाप्या शेखसह 12 आरोपींना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पाटणी या युवकांचे अपहरण करून निर्दयपणे खून केल्याप्रकरणी आज गुरुवारी (ता.3) गुन्ह्यातील मुख्य आरोपी पाप्पा उर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह अकरा आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एकुण 24 आरोपी असलेल्या गुन्ह्यातील 12 संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली त्यात शिक्षा ठोठावलेला मुख्य आरोपी पाप्याच्या पत्नी व भावाचाही समावेश आहे.

नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पाटणी या युवकांचे अपहरण करून निर्दयपणे खून केल्याप्रकरणी आज गुरुवारी (ता.3) गुन्ह्यातील मुख्य आरोपी पाप्पा उर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह अकरा आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एकुण 24 आरोपी असलेल्या गुन्ह्यातील 12 संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली त्यात शिक्षा ठोठावलेला मुख्य आरोपी पाप्याच्या पत्नी व भावाचाही समावेश आहे.

जन्मठेपेसह या आरोपींवर न्यायालयाने एक कोटी 34 लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. निकालानंतर मृत रचित पाटणी याच्या वडीलांनी "भगवानके घर देर है, लेकीन अंधेर नही. अशी भावना व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. 

मृत प्रवीण गोंदकर आणि त्याचा मित्रा रचित पाटणी यांचे 14 व 15 जून 2011 खंडणीच्या रक्कमेच्या तडजोडीसाठी मुख्य आरोपी पाप्पा उर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह त्याच्या साथीदारांनी सुरभी हॉटेलमध्ये बोलावून घेतले. या दोघांचे अपहरण करुन अज्ञात स्थळी व तेथून निमगाव येथील वाल्मिक पावलस जगताप यांच्या शेतात नेत रात्रभर ठेवले. तेथे आरोपींनी दोघांना बेदम मारहाण,अत्याचार करत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. तशा अवस्थेत त्यांचे फोटोही काढले. मारहाणीत गोंदकर व पाटणी या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीनी दहशत माजविण्यासाठी दोघांचे नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजली जवळ टाकून दिले.

अतिशय निर्दयीपणे खून झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शिर्डीसह राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी विलास पंढरीनाथ गोंदकर (47, रा बिरेगाव रोड,शिर्डी, नगर) यांच्या फियार्दीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात पाप्पा शेख यांच्यासह 24 जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यापैकी एक आरोपी अखेरपर्यत सापडलाच नाही 
 
घटनेची पार्श्‍वभूमी 
तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून 24 पैकी 23 संशयितांना अटक केली. तपासावरून या दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार हा पाप्या शेख असल्याचे समोर आले. पाप्याची शिर्डीसह पंचक्रोशीतील दहशतीमुळे त्याच्यासह त्याच्या टोळीवर सुमारे 22 गुन्हे दाखल असल्याने या 
टोळीवर खुनाच्या गुन्ह्यासह तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी पाप्याच(28, रा कालिकानगर, शिर्डी, नगर) नाव पुढे आणले. पाप्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर विविध प्रकारचे 22 गुन्हे दाखल असल्याने या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली.

शिर्डीतील पाप्याची दहशत पाहता हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चालविण्यात आला. यासाठी सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम व ऍड. अजय मिसर यांची नियुक्ती झाली. त्यात, ऍड निकम यांनी दोन तर मिसर यांनी 43 साक्षीदार तपासले. 
-
पोलिस बंदोबस्त आणि गर्दी 
 खटल्याची आज अंतिम सुनावणी न्यायमुर्ती शर्मा यांच्या न्यायालयात होणार असल्याने आवारात प्रचंड गर्दी होती. गर्दीत पाप्याचे समर्थक होते तसेच मृतांचे कुटुंबिय होते. त्यामुळे सकाळपासूनच मोठा बंदोबस्त होता. त्यांनी यातील मुख्य आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख यांच्यासह 11 जणांना दोषी ठरवत या सर्वांना जन्मठेपेची शिक्षेसह दंडही ठोठावला. सरकारी पक्षातर्फे वकील अजय मिसर यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक सुनील कडासने यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश मुदगीर, मुकुंद कणसे, राजेंद्र औटी यांच्या पथकाने केले. 

जन्मठेप सुनावलेले आरोपी 
पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (32), विनोज सुभाष जाधव (31), सागर मोतीराम शिंदे (19), सुनील ज्ञानदेव लहरे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (26), माऊली उर्फ ज्ञानेश्‍वर शिवनाथ गुंजाळ (22), गणी मेहमूद सय्यद (30), यिंग्या उर्फ समिर निजाम पठाण (24), रहिम मुनावर पठाण (23), सागर शिवाजी काळे (20), निलेश देवीदास यिकसे (19), निसार कादर शेख 

गुन्ह्यातून निर्दोष सुटलेले.... 
राजेंद्र किसन गुंजाळ (33), इरफान अब्दुल गणी पठाण (20), मुबारक ख्वाजा शेख (भाऊ 22) वाल्मिक पावलस जगताप (42), दत्तात्रय बाबुराव कर्पे (35), भारत पांडुरंग कुरणकर (49), बिस्मिल्ला पाप्पा उर्फ सलीम शेख (पत्नी,25), संदीप शामराव काकडे (24), हिराबाई शामराव काकडे (49), मुन्ना गफूर शेख (24), राजू शिवाजी काळे (21), प्रकाश सुरेश अवसरकर (22) 

अशी घडली घटना 
- 14 जून 2011 रोजी खंडणीतील रक्कमेसाठी प्रविण गोंदकर आणि रचित पटणी यांना रात्री पाप्यासह त्याच्या साथीदारांनी राहता येथील हॉटेलमध्ये बोलावले 
- दोघेही हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर चर्चेनंतर या दोघांचेही पाप्यासह त्याच्या साथीदारांनी स्कार्पिओ वाहनातून अपहरण करून अज्ञात स्थळी नेले 
- रात्रभर पाप्यासह इतरांनी ह्या दोघांना बेदम मारहाण करत एकमेकांना अनैर्सिक कृत्य करण्यास भाग पाडून त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. 
- मारहाणीबरोबर ह्या दोघांना भरपूर दारू पाजली 
-दोघांनीही पिण्यासाठी पाणी मागितले असता त्यांना पाणी ने देता बेदम मारहाण करत राहिले. 
-पहाटेच्या सुमारास मारहाणीमुळे ह्या दोघांचाही मृत्यू झाला आणि त्याचे मृतदेह संशयितांनी शिर्डी येथील साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल पुप्पांजली येथे आणून टाकले. 

परिस्थितीजन्य पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी आपले कौशल्यपणास लावून या गुन्ह्याचा सखोल तपास केल्याने न्यायालयात आरोपींविरूद्ध ठोस पुरावे ठेवता आले. त्याचप्रमाणे वैद्यकीय अहवाल आणि एका आरोपीच्या जबाबवरून न्यायालयाने यातील 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा खास बाब म्हणजे यातील एकाही साक्षीदार फितुर न ठरल्याने आरोपीना कठोर शिक्षा मिळाली. 
अजय मिसर (सरकारी वकील) 

या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवरून एक-एक कडी जोडण्यात आली. प्रत्येक साक्षीदारांने हिंमत दाखविल्याने आज अखेर दुहेरी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी हे विचाराहीन असल्याने त्यांना ही शिक्षा योग्य आहे. नागरिक, पोलिस आणि सरकारी वकील यांच्या समन्वयामुळे हे सर्व मिळून आले. 
सुनील कडासने (तपासी अधिकारी ,पोलिस अधीक्षक, राज्य गुप्तावार्ता) 

आज आमच्या लढ्याला यश आले आहे. घटना घडल्यापासून ते न्याय मिळेपर्यंत अनेक अडचणी आमच्या समोर उभ्या राहिल्या मात्र साई बाबांच्या आर्शीवादामुळे आम्ही सर्व समस्यांवर मात केली आणि आज सर्व आरोपींना खरे तर फाशीची शिक्षा अपेक्षित होती मात्र जो निर्णय न्यायालयाने आम्हाला दिला आहे. त्यावर आम्ही सर्व समाधानी आहोत. (विलास पंढरीनाथ गोंदकर फिर्यादी ) 

"भगवान के यहा देर है अंधेर नही' न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सरकारी वकील उज्वल निकम, ठामपणे साक्ष देणारे जितेश लोकचंदानी, तपासी अधिकारी सुनिल कडासने व तत्कालीन पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश यांचे आम्ही सर्व जण ऋषर आहोत. 
सुदेश पाटणी (मृत रचित पाटणी ह्याचे वडील) 
 

Web Title: marathi news shirdi murder case