यशस्वी होण्याचा मूलमंत्र 'वेळेचे बंधन!' 

सुहास कोकाटे
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

या गोष्टी विसरू नका

आपण "वेळ' पाळल्यास "वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे. 

मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो. कोणतेही काम करताना ते वेळेत पूर्ण करता यावे, यासाठी त्या कामालाही वेळेचे बंधन असणे आवश्‍यक असते. कामाला वेळेचे बंधन घातल्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्मी व ऊर्जा मनात व शरीरात निर्माण होते. वेळेचे बंधन घालता न आल्यास कालावधी वाढत जातो. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत हा कालावधी वाढत जाऊन पाच ते दहा वर्षे झाल्यास आपोआपच नैराश्‍य येते. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थी वेळेचे महत्त्व, त्याचे मूल्य जाणतात. अभ्यासक्रमात दिलेले विषय व अभ्यासातील सातत्य टिकवून व योग्य मार्गदर्शन मिळवून ध्येय वेळेत पूर्ण करतात. वेळ आपल्या हातून निसटून जाण्याची शक्‍यता आहे, याची जाणीव त्यांना असते. बेंजामिन फ्रॅंकलिनने वेळेबाबत खूप सुंदर मत व्यक्त केलेले आहे. त्यांच्या मते, "आज करता येण्यासारखे काम कधीही उद्यावर ढकलू नका.' यामुळे काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागतो. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताना किती कालावधी द्यायचा आहे, हे पक्के करणे आवश्‍यक ठरते. 

स्वतःवर वेळेचे बंधन घाला... 
एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे म्हटले जाते. एकाग्रता साधणे म्हणजे मन व शरीरावर नियंत्रण मिळवणे होय. मनाला शिस्त लावणे याचाही समावेश एकाग्रतेमध्ये होतो. अभ्यासाचे नियोजन करून, त्या नियोजनामध्ये सातत्य ठेवून ते पूर्ण करता यावे यासाठी मनाला शिस्त लावणे आवश्‍यक असते. अशा प्रकारे एकाग्रता राखता आल्यास ध्येय साध्य व्हायला वेळ लागत नाही. या ठिकाणी शिस्त लावणे म्हणजे "आपल्याला जे आवडते ते न करता, जे करणे गरजेचे आहे तेच करणे,' या अर्थाने त्याचा विचार केला जातो. 

योग्य मार्गदर्शन 
ध्येयाच्या दिशेने जाताना अचूक निर्णय घेणे आवश्‍यक असते. योग्य मार्गदर्शन म्हणजे फक्त पुस्तकांची माहिती घेणे अथवा कोणत्या पुस्तकातील कोणता भाग महत्त्वाचा आहे एवढेच नसून, त्या पुस्तकातील माहिती घेताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचे आहे ते वेळेत समजावून घेता आले पाहिजे. यानंतर नोट्‌स काढताना कोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे, एखादा मुद्दा अभ्यासताना तो चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून कसा समजावून घेतला पाहिजे, हे देखील समजणे महत्त्वाचे असते. एखादा घटक अभ्यासून पूर्ण झाला आहे असा आपला समज असल्यास त्या घटकावरचे जास्तीत जास्त प्रश्‍न सोडविताना कोणती काळजी घेतली पाहिजे, परीक्षेचा आधीचा सराव व प्रत्यक्ष परीक्षेमध्ये पेपर सोडविताना कोणते नियोजन करावे, अभ्यासक्रमातील सर्व घटक पूर्ण करता यावेत यासाठी अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे नियोजनाच्या मदतीने छोटे-छोटे टप्पे कसे पाडावेत व ते पूर्ण करीत मोठे ध्येय कसे साध्य करावे, अभ्यासातील सातत्य ठेवायचे म्हणजे नेमके काय करायचे, अभ्यासक्रमावरील प्रश्‍न सोडविताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात व त्यावरील उपाययोजना कोणत्या या सर्व गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारे सर्व घटकांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळाले तर निश्‍चितपणे ध्येयाकडे होणारा प्रवास योग्य दिशेने असेल यात शंकाच नाही. 

बारामतीकर तुमचे अभिनंदन! 
मागील आठवड्यात बारामतीतील (कै.) वसंतराव पवार नाट्यगृहात "शिवनेरी' व "सकाळ विद्या' यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची मॉक टेस्ट घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे गुण शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून कळविले जातील. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने राज्यभरात अशा मॉक टेस्ट सुरू आहेत. त्यामधून आणखी निवडक उमेदवारांची निवड केली जाईल. 

अभ्यासात "स्मार्टपणा' महत्त्वाचा...! 
राज्यसेवेमध्ये यशस्वी होण्याचे माझे स्वप्न आहे, मात्र आजवर योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. कोचिंग क्‍लास लावण्याचाही निश्‍चय केला, पण आर्थिक कारणांमुळे मला प्रवेश घेता आला नाही. कॉलेज संपल्यानंतर खासगी आयटी सेक्‍टरमध्ये काम करण्यास सुरवात केली. याच वेळी माझ्याबरोबर काम करत असलेले दोन ते तीन मित्र व मी बॅंकिंग क्षेत्रामधल्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची घरीच सुरवात केली. हा अभ्यास सुरू असतानाच माझा एक मित्र रेल्वेमध्ये सिलेक्‍ट झाला व माझी संरक्षण क्षेत्रामध्ये निवड झाली, दरम्यानच्या काळात माझी इतर दोन ठिकाणीही निवड झालेली होती, पण आवड असल्यामुळे मी संरक्षण क्षेत्राचीच निवड केली. आता माझी सेल्स टॅक्‍स ऑफिसर होण्याची इच्छा आहे, पण मला वेळ काढून मार्गदर्शन वर्गामध्ये जाणे शक्‍य नाही. याच वेळी मी शिवनेरी ऍकॅडमीने तयार केलेल्या "एमपीएससी स्मार्ट किट'बद्दल ऐकले. थोडाही वेळ न घालवता मी त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर जाऊन व्हिडिओ लेक्‍चर्स पाहिले व त्याच दिवशी ते खरेदीही केले. मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो, की शिवनेरी ऍकॅडमीने ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे ते पाहून व अभ्यासून मी पाहिलेले स्वप्न व माझा विश्‍वास बळकट झाला आहे. मी या अभ्यासक्रमाच्या मदतीने माझे स्वप्न कोणताही मार्गदर्शन वर्ग न लावता पूर्ण करू शकतो. या "एमपीएससी स्मार्ट किट'मध्ये सर्व विषयांचे पूर्ण पॅकेज आहे व यामध्ये सर्व विषय शिकवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रत्येक घटक पूर्ण करण्यात आलेला आहे. मला काही मुद्दे असेही मिळाले, जे यापूर्वी माझ्या वाचण्यात आलेले नव्हते. शिवनेरीचे ही किट माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरले आहे. मी यामधील व्हिडिओ लेक्‍चर्स व नोट्‌स केव्हाही पाहू शकतो व अभ्यास करू शकतो. मी "शिवनेरी ऍकॅडमी' व "सकाळ विद्या' यांचा किट तयार केल्याबद्दल आभारी आहे. जे विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे व इतर काही कारणांमुळे मार्गदर्शन वर्गामध्ये जाता येत नाही अशा विद्यार्थ्यांना हे किट वरदान ठरेल, अशी मला खात्री आहे. 
- युगुल पी. नामपल्लीवार, डिफेन्स इस्टेट, नागपूर. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Shivneri Foundation Suhas Kokate Writes success