शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल वाघ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - कृषी जगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्यविश्‍वासोबत सांगड घालण्यासाठी म्हणून घेण्यात येणारे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन बुधवारी (ता. 31) पु. ल. देशपांडे अकादमी येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषवणार आहेत. 

कृषी-अर्थशास्त्र, नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी व मराठी साहित्यक्षेत्राकडून शेतीजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून सरोज काशीकर, तर ज्येष्ठ शेतकरी नेते विशेष अतिथी म्हणून रामचंद्रबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात नांदेड, कोल्हापूर, सांगली, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत. संमेलनात शेतकऱ्यांच्या जिव्हाळाच्या प्रश्‍नांवर परिसंवाद होणार आहे. तसेच शेतकरी कवी संमेलन व शेतकरी गझल मुशायरा अशी दोन सत्रे होणार आहेत. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news vitthal wagh shetkari sahitya sammelan