'यूपीएससी'त फडकला मराठीचा झेंडा; राज्यभरातून झाली एवढ्या जणांची निवड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

'यूपीएससी'मध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे. यंदा ८० ते ८५ जण यशस्वी झाले आहेत. पदवी पासून तयारी सुरू केल्यास पहिल्याच प्रयत्नात यश मिळते ते मंदार पत्कीच्या उदाहरणून स्पष्ट होते. विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेची तयारी लवकर सुरू केल्यास राज्याची कामगिरी अाणखी चांगली होईल. यामध्ये मुलींचे व अल्पसंख्याक समाजाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे."
- तुकाराम जाधव, युनिक ॲकडमी

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यंदाही मराठीचा टक्के १० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण राज्यातून ८० ते ८५ जणांची निवड झाली आहे. यामध्ये पुणे, मुंबई या महानगरामधील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील विद्यार्थीही रँक मध्ये आले असल्याचे चित्र यंदाच्या निकालात आहे. तर पहिल्या १०० मध्ये तीन ते चार जणांचा समावेश आहे. बीडचे मंदार पत्की (२२), पुण्याचे आशुतोष कुलकर्णी (४४), नांदेडचे योगेश पाटील (६३) राहुल चव्हाण ( सोलापूर), पुण्याच्या नेहा देसाई (१३७), जयंत मंकले (१४३), मुंबईचे प्रसाद शिंदे (२८७) यासह राज्यात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यंदा यश मिळवले आहे. महाराष्ट्राच्या एकुण निकालात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या उमेदवारांना जास्त यश मिळाले आहे.

पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

गेल्या काही वर्षांपासून 'यूपीएससी'मध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना यश मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी साधारणपणे एकुण निकालात ८ ते १० टक्के उमेदवार असतात. पदवीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यास यापेक्षा चांगला निकाल लागू शकतो, असे जाणकारांचे म्हणने आहे. 

देशपातळीवर ८२९ जणांची निवड यादी जाहीर केली आहे. त्यात १८० आयएएस, २४ आयएफएस, १५० जणांची आयपीएस म्हणून निवड झाली आहे. तर सेंट्रल सिव्हिल ग्रुप ए साठी ४३८ व ग्रुप बी साठी १३५ जणांची निवड करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

'यूपीएससी'मध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे. यंदा ८० ते ८५ जण यशस्वी झाले आहेत. पदवी पासून तयारी सुरू केल्यास पहिल्याच प्रयत्नात यश मिळते ते मंदार पत्कीच्या उदाहरणून स्पष्ट होते. विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेची तयारी लवकर सुरू केल्यास राज्याची कामगिरी अाणखी चांगली होईल. यामध्ये मुलींचे व अल्पसंख्याक समाजाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे."
- तुकाराम जाधव, युनिक ॲकडमी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Student Success in UPSC exam