
हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चाचं आयोजन केल्यानंतर राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण राबवण्याचा जीआर रद्द केला. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एकत्र विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतच विजयी मेळावा होईल पण ठिकाण चर्चेनंतर ठरवू असं सांगितलं होतं. दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून विजयी मेळाव्याचं ठिकाण जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र दिसतील.