Shirdi Sai Baba Sansthan donates ₹1 crore to Maharashtra CM Relief Fund for Marathwada flood victims and affected farmers.

Shirdi Sai Baba Sansthan donates ₹1 crore to Maharashtra CM Relief Fund for Marathwada flood victims and affected farmers.

esakal

Marathwada Flood Relief : पुरामुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी शिर्डी साई संस्थान धावले, एक कोटीची केली मदत

Shirdi Sai Baba flood Aid : मराठवाड्यात पुराच्या हाहाकाराने बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र आता मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शेगाव संस्थाननंतर शिर्डी संस्थाननेही एक कोटींची मदत केली आहे. पुढील काही दिवसांत पूरस्थितीही कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
Published on

Summary

साई संस्थानने पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला.

अतिवृष्टीमुळे २७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान व २ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सुमारे १०० लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत.

मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून पूराने जमिनी, घरे दारे वाहून गेल्याने शेतकरी संकटात आहे. या संकटातून बळिराजाला सावरण्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानने एक कोटींची मदत जाही केल्यानंतर आता शिर्डीचे साईबाबा संस्थान देखील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहे. संस्थानने पूरग्रस्तांसाठी १ कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com