मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता.१९) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमधील धोंदलगाव, जालन्यातील लोणार, भायगाव, अंबड, लालवाडी, नांदेडमधील बितनाळ, वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या.

पुणे - राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता.१९) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमधील धोंदलगाव, जालन्यातील लोणार, भायगाव, अंबड, लालवाडी, नांदेडमधील बितनाळ, वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. राज्यात आजपासून (ता.२०) बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

मॉन्सूनने देश व्यापला
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) पश्चिम राजस्थानातील उर्वरित भागात प्रगती करत संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. साधारणतः १५ जुलै रोजी देश व्यापणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने देशाच्या सर्व भागात पोचला आहे. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान व्यापून ८ जूनला केरळात डेरेदाखल झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Rain Monsoon