मराठवाड्याचे आता परतीच्या पावसाकडे डोळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे संकट वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

राज्यातील धरणांमध्ये सध्या ८५५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. हे प्रमाण सध्या ८३.२७ टक्‍के आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात पाणीसाठा आठ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. 

मराठवाड्यात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात ९८ टक्‍के पाणीसाठा आहे. मात्र, औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांमधील धरणे कोरडीच आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात उपयुक्‍त पाणीसाठा अद्याप शून्यावरच आहे. परिणामी, लातूरला १० ते १२ दिवसाला एकवेळ पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, सिद्धेश्‍वर, नांदेड जिल्ह्यात लोअर मन्यार, उस्मानाबाद जिल्ह्यात निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात उपयुक्‍त पाणीसाठा नाही. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Rain Water Shortage