उद्यापासून मार्डचा बेमुदत संप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील सुमारे 4500 निवासी डॉक्‍टरांनी बुधवारपासून (ता. 7) बेमुदत संप पुकारला आहे.

मुंबई - विद्यावेतन व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी व महापालिका रुग्णालयांतील सुमारे 4500 निवासी डॉक्‍टरांनी बुधवारपासून (ता. 7) बेमुदत संप पुकारला आहे.

या दिवशी निवासी डॉक्‍टर अत्यावश्‍यक सेवेतही सहभागी होणार नसल्याची माहिती सेंट्रल मार्ड या संघटनेने दिली. त्यामुळे बुधवारी रुग्णसेवा कोलमडण्याची शक्‍यता आहे. राज्यभरात सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना अद्याप विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. अकोला, अंबेजोगाई, लातूर, नागपूर येथील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना चार महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. निधीअभावी विद्यावतेन रखडल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयांनी दिल्याची माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mard strike from tomorrow