जवानांचे पार्थिव मूळगावी आणल्यानंतर महिलांना कोसळले रडू

जवानांचे पार्थिव मूळगावी आणल्यानंतर महिलांना कोसळले रडू

औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या होत्या. 

काश्‍मिरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपूत आणि चोरपांगराचे (ता. लोणार) नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता. 16) दुपारी साडेबारा वाजता विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर आले. तत्पूर्वी सकाळी सात वाजेपासून विमानतळावर राजकारणी लोकांसोबत सामान्य नागरिकांनी हजेरी लावण्यास सुरवात केली. सकाळी अकरा वाजेपर्यंत हजारो शहरवासियांनी विमानतळ परिसरात श्रद्धांजली वाहण्यास आले होते. 

विमानाचा आवाज येऊ लागल्यानंतर विमानतळावर ज्याठिकाणी पार्थिव ठेवण्यात येणार होते. त्याठिकाणचे अधिकारी अलर्ट झाले. याचवेळी नागरिकांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरवात केली. "अमर रहे अमर रहे, वीर जवान अमर रहे', "हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' औरंगाबादेत आणण्यात आले.

विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी 'अमर रहे, अमर रहे', 'वीर जवान अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संजयसिंह राजूपत अमर रहे, नितिन राठोड अमर रहे असा जयघोषही झाला. 

सीआरपीएफ, सीआयएसएफ जवान, महाराष्ट्र पोलिस यांच्यासह विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना झाले. 

इस्कॉनतर्फे कीर्तनातून श्रद्धांजली 

इस्कॉन औरंगाबादतर्फे हरिनाम संकीर्तन सादर करण्यात आले. "हरे कृष्ण हरे राम' नामस्मरण करीत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीकांत जोगदंड, डॉ. हनुमान प्रभु, अनिल मुंडे, देवांश शर्मा, ज्ञानेश्वर हिवरे, शैलेश आग्रवाल, चंद्रकांत मंडणकर, बळीराम राठोड यांनी सादरीकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com