मुंबईमधील डोंगरी परिसरात एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि चार टॅंकरच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अन्सारी हाईट्स नावाच्या इमारतीला भीषण आग लागली असून या इमारतीत अनेक लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.