Maths Teachers : राज्यात गणिताच्या शिक्षकांची कमतरता; नव्या भरतीत प्राधान्य देण्याची आवश्‍यकता

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे.
Maths Teachers
Maths Teacherssakal

पुणे - राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता हा नवा विषय नाही. पण गांभीर्याची बाब म्हणजे बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाचा शिक्षक नसल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. समायोजनानंतरही परिस्थिती फारशी बदललेली नसून, नव्या भरती प्रक्रियेत गणिताच्या शिक्षकांना प्राधान्य देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि आकलन क्षमतांच्या विकासासाठी दोन्ही विषय महत्त्वपूर्ण आहेत. मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर लवकरच भरती केली जाणार आहे.

त्यात बहुतांश गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात गणित विषयातील टीईटी परीक्षा उत्तीर्ण (पेपर-२) शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी भरती प्रक्रिया राबवूनही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यात बीएड पदवीधारक इयत्ता सहावीपासून पुढील विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे गणिताला शिक्षक कोठून आणणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गणिताची टीईटी उत्तीर्ण गरजेचे

गणित शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी गणित विषय घेऊन टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांत केवळ दोन हजार ३७ उमेदवार टीईटी परीक्षा घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील रिक्त जागांचा विचार करता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या खूप कमी आहे.

तुलनेने सामाजिकशास्त्र विषयातील उत्तीर्ण उमेदवारांची संख्या दहा पटीने जास्त आहे. मागील तीन वर्षांत सामाजिकशास्त्र विषयातील तब्बल २१ हजार २४३ उमेदवार टीईटी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीत खरी स्पर्धा सामाजिकशास्त्र विषयातील शिक्षकांमध्ये असणार आहे.

प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची वानवा आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रियेत अनेक समस्या निर्माण होतात. नव्या भरतीत धोरण शिथिल करत गणिताच्या शिक्षकांची भरती प्राधान्याने करणे गरजेचे आहे. बिंदुनामावलीच्या अंमलबजावणीनंतरही ज्या शाळांना या विषयांचे शिक्षक मिळणार नाहीत, त्यांच्याकडून हमीपत्र घेत गणिताच्या शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी घ्यावी.

- हरिश्‍चंद्र गायकवाड, माजी अध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com