

Security Concerns at Matoshree
Sakal
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत पक्षाच्या नेत्यांनी चिंता व्यक्त करीत सखोल चौकशीची मागणी केली. अखेर कुर्ला-बीकेसी-वांद्रेदरम्यान उभारल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पोलिसांच्या परवानगीने ड्रोन सर्वेक्षण केल्याचे स्पष्ट झाले.